बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१

रस्त्यांचे आजार | कविता

💥 रस्त्यांचे आजार 💥


काय सांगू कसे सांगू
रस्त्याचे जे हाल झाले
डांबर सारी गेली विरून 
दगड मातीचे माळ झाले

बुजविता आज एक खड्डा
उद्या दुजा तो खुणवितो
अवतरलो आज मी पहा
मज असे तो खिजवितो

खड्डयांचीच गतिरोधके
रस्त्यांमध्येच तलाव झाले
रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ते
पाहून डोळे लाल झाले

पाठीला दणके हजार
मणके असे बेजार झाले
सांगवेना सोसवेना
रस्त्यांचेच आजार झाले
काय सांगू कसे सांगू
रस्त्यांचे जे हाल झाले


कवी - विवेक शेळके

           9273049345

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवगीत स्वातंत्र्याचे

 नवगीत स्वातंत्र्याचे चिरतरुण स्वातंत्र्याचे  | नवगीत गाऊया सारे  नव्या जगाचे नव्या युगाचे | घुमूदे नव्याने वारे    |धृ| गरीब श्रीमंत भेद नक...