लघुकथा :- कुजबुज
२४ वर्षाचा राघव काही महिन्यांपूर्वीच या सोसायटी मध्ये राहायला आला होता. स्वभावाने मुळातच हळवा अन सर्वांना मदत करण्याची भारी हौस असणारा. सोसायटीमध्ये येताजाता लागेल त्याला मदत करायचा.
मुलं माणसं म्हातारी मंडळी आणि मंडई मध्ये जाणाऱ्या बायका . सोसायटीपासून मंडई पर्यंत जायला अनेकदा हा सर्वाना उपयोगी पडायला लागला. सोसायटीमधल्या बायका नेहमीच त्याच्या गाडीवर बसून जात असत. आज ह्या काकू तर कधी त्या वहिनी . रिक्षाचे भाडे वाचल्यामुळे राघव किती चांगला मुलगा आहे , सर्वांना किती मदत करतो म्हणून त्यांच्या घरात पुराण लावायच्या . याचा परिणाम असा झाला कि सोसायटी मधील सगळ्या विवाहित मध्यमवयीन पुरुषांमध्ये राघव बद्दल कुजबुज सुरु झाली आणि आज सकाळी सकाळी आलाय मोर्चा .......
म्हणून म्हणतो मदत करा पण सांभाळून !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा