रविवार, ३० मे, २०२१

चारोळी संग्रह | 11 ते 20

 

___________________________________________________


नजरेत भाव पाहिले मी

तुझे समर्पण होते

नाते जुळताना अनोळखी

थोडेसे दडपण होते


माणूस आज बंदिवान 

मुक्त सारे पशु पक्षी

निसर्गाची किमया सारी

रेखाटिली त्याने नक्षी


कधीतरी संकटेही 
शिकवून जातात बरेच काही 
कठीण परिस्थितीतही
उभरण्याची देतात ग्वाही 


आज वेळ नाही म्हणून
उद्यावर ढकलायचं नसतं
संधी येते एकदाच
तिला वगळायचं नसतं


फिरून फिरून थकलो सारे 
लॉकडाऊन ने केलं गार 
सुट्टीसाठी बोंबलणारे
रोज भोगती आज रविवार


कामाचा व्यापाच असा की
कुटुंबासाठी मिळेना वेळ
लॉकडाऊन ने दिली संधी
नात्यांमध्ये बसतोय मेळ


आयुष्य काही क्षणांचे 
भासे मातीमोल जरी
मनीच्या पाखरा
आज घेऊ दे भरारी

लॉकडाऊन चा असा 
उडवून भारी फज्जा
नेतेच करतात आंदोलन
राजकारणाची मज्जा

तुझ्या नजरेने होऊन घायाळ
मी आजही झुरतो आहे 
अर्पून तुलाच सारे मी 
माझे मलाच उरतो आहे

गंध तुझा सखे मोहवणारा
हवा हवासा मज वाटे
वाऱ्या वरती भूर भूर उडती
केसांची सावली ती दाटे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवगीत स्वातंत्र्याचे

 नवगीत स्वातंत्र्याचे चिरतरुण स्वातंत्र्याचे  | नवगीत गाऊया सारे  नव्या जगाचे नव्या युगाचे | घुमूदे नव्याने वारे    |धृ| गरीब श्रीमंत भेद नक...