----------------------------------------------------------------------------
जन्म जन्मांतरीचे हे
नाते तुझे न माझे
पाहताच तुजसवे मजला
हा निशिगंध हि लाजे ......
घालतो सखे मी तुजला
माझ्या कवी मनाने साद
तुझ्या डोळ्यांतील आसवे ही
माझ्या रचनेला खरी दाद
मेघ दाटुनी येती अंबरी
हुरहूर ती मनात होते
अवचित पावसाचे
संकेत जणू देते
चंद्रकोर कुंकवाची
अशी रेखून तुझ्या भाळी
रंग मागे सारून त्याचा
सौभाग्य मोल ल्याली
रूप काय वर्णू मी तुझे
शब्द पडती तोकडे
असफल झाले म्हणुनी
शब्दांसवे माझे वाकडे
सोबत असता तू
स्वप्नांना नवा अर्थ येतो
तुझा शब्द न शब्द आश्वासक
जगण्याला नवे बळ देतो
तुझ्या न माझ्या नात्याची
परिभाषा मी करू कशी
दोन मनांचे मिलन जणू
वीण नात्यांची अशी
शब्द हि माझे सोबती
जेव्हा गातो तुझी प्रीती
अर्थ लाभतो रचनेला माझ्या
नाचती अक्षरे भोवती
नजरेचा खेळ सारा
अन तुझे लाजणे ते
मी धुंद बेहोष होतो
तू मला छेडताना
तुझे गालातच हसणे
खोड तुझी ग न्यारी
जीव असा का गुंतला
वेडा म्हणते दुनिया सारी

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा