उणीव
येते सर पावसाची
चिंब भिजवूनी जाते
ओल्या ओल्या मनाने
गीत जणू गाते
थेंब टपोरे टपोरे
असा धरतात ताल
पानां पानांतून तरु
त्याला लावतात चाल
गार वारा सोबतीला
एक आल्हाद जाणीव
सखे रिमझिम पावसाला
भासे तुझीच उणीव
@ विवेक
शेळके
नवगीत स्वातंत्र्याचे चिरतरुण स्वातंत्र्याचे | नवगीत गाऊया सारे नव्या जगाचे नव्या युगाचे | घुमूदे नव्याने वारे |धृ| गरीब श्रीमंत भेद नक...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा