अ ल क ( अति लघु कथा )
अलक किंवा 'अती लघु कथा' हा एक नविन गद्य कथा-प्रकार आहे. यात थोडक्या शब्दात बराच मोठा अर्थ सांगण्यात येतो. हा प्रकार काहीसा चारोळी या पद्य-प्रकारासारखा आहे. हा प्रकार सोशल मिडियावर जास्त प्रचलित आहे, कारण तो जास्त जागा व्यापत नाही.
यात पुन्हा दोन उपप्रकार आहेत: सकारात्मक व नकारात्मक.
सकारात्मक अलक मध्ये वाचकावर सकारात्मक परिणाम साधल्या जातो. तर, नकारात्मक अलकमध्ये त्याउलट.
अलक १ :
दिवसभर काम करून थकून आलेल्या नवऱ्याला तिने प्रेमाने तांब्याभर पाणी दिले. मुलाने विचारले बाबा तुम्ही थकलात का ? त्याने हसून उत्तर दिलं, थकवा तेव्हाच येतो , जेव्हा आपल्याला विचारणार कुणी नसतं.
अलक २ :
तापाने फणफणलेली आई स्वयंपाक करत होती.हे बघून लहान मुलगी झाडू मारू लागते, मोठी मुलगी हातातला मोबाईल बाजूला ठेऊन तिला स्वयंपाकात मदत करू लागते, बाबा तिच्यासाठी औषध घेऊन येतात आणि आजी आज निमुटपणे जेवत असते. कोणतीही उणीव न दाखवता !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा