नवगीत स्वातंत्र्याचे
चिरतरुण स्वातंत्र्याचे | नवगीत गाऊया सारे
नव्या जगाचे नव्या युगाचे | घुमूदे नव्याने वारे |धृ|
गरीब श्रीमंत भेद नको | अन नको ती जातपात
स्वतःस घडवू आपण सारे | हाती घेऊन हात
प्राणपणाने लढले जे | आठवू त्यांना सारे
त्यागाला त्यांच्या शौर्याला | हृदयी स्थान द्या रे |१|
इमान राखु मातीशी | अन लाज तिरंग्याची
उठू पेटूनि न्यायासाठी | हीच गरज काळाची
एकजुटीने एकदिलाने | देश घडवू यारे
गाडून टाकू स्वार्थ आपला | सारे सोबती घ्यारे |२|
नवक्रांतीचे ध्येय नवे | उरी धगधगती आस
देशासाठी लढा उभारू | मनी बाळगू ध्यास
पुन: नव्याने विजयाचा | शिल्पकार तू होरे
नव्या जगाचे नव्या युगाचे | घुमूदे नव्याने वारे |३|
विवेक लडकू शेळके
९२७३०४९३४५
कल्याण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा