जनसेवक ?????....
उठसूट फेकाफेकी
राजकारण्यांना जमते भारी
म्हणवती स्वतः जनसेवक
अन नियत झक मारी
निवडणूक येता राम राम
संपताच तुझं काय काम
विकास गुदमरून मेला म्हणे
मरणाचं कुठे येतं दाम
लोकशाही माहीत नाही
हुकूमशहा बनलेत सारे
सत्ता येता बुडाखाली
कानामागून जाती वारे
लोकांना फक्त भुलवायचं
काम यांना जमते भारी
समस्येचं राजकारण
यांच्यासाठी चहा खारी
अडल्या नडल्या मदतीसाठी
कुणीतरी उभा राहतो
बघू त्याची मजा म्हणून
विरोधक मख्ख पाहतो
आता तरी सुधार बाबा
निवडणूक जवळ येतेय
जनता थोडी हुशार झालीय
कामासाठी मत देतेय
राजकारणाची मक्तेदारी
तुम्ही स्वतःची म्हणू नका
मतांसाठी भीक मागता
जास्त लाल घोटू नका
©कवी विवेक शेळके

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा